HAPPY RAKSHA BANDHAN - Rakhi


राखी






देवा तुया दारी
ठाम बसली मांडुन
मांगतला भाऊराया
तवा उठली तेथुन






भाऊ राखी बांधतो तुले
आशानाई धन संपत्तीची
देवु घेवु नको मले काही
सेवा कर फक्त मायबापाची







धन संपत्तीची आशानाई मले
पदर पसरुन मागतो देवाले
सुखी समृध्दीनं देवा ठेव
माहया माहेरच्या गणागोताले








पाच माहे बंधु
पाचाचे पाच शेले
जरीची नको साडी
आयुष्य दे माया नेनत्या भावाले



पुसतीन आयाबाया
साडी कोणं नेसवली
बंधू मावा शावकार
सण राखी साजवली
 



घरमाव दार
दारात गुलाबाच फुल
ध्यान ठेव दादा तु राखीची
भुल पडु देवु नको बहीनीची






ओवाळते भाऊराया
आरतीत नको काई टाकु
समयाच्या शिरी
एकली नको राकु.




-(प्रयोग शाळा पारीचर
सौ. पदमावती गणेश तायडे
महात्मा फुले महाविदयालय,
वरुड, जि. अमरावती

-----------------

1. नेनता- लहान    2. समयाच्या शिरीकठीण प्रसंगात
21/08/2013 9:00 pm
 - Pranay Sundarkar

Blogger




Comments